बॉलिवूडचा 'सिंघम' अजय देवगण लवकरच छोट्या पडद्यावर येत आहे. परंतु, तो अभिनेत्याऐवजी निर्मात्याच्या भूमिकेत दिसणार आहे. योगगुरू रामदेव बाबा यांच्या जीवनावर आधारित मालिका लवकरच 'डिस्कव्हरी जीत'वर पाहता येणार आहे.स्वामी रामदेवः एक संघर्ष’ असे या मालिकेचे नाव असणार आहे. यात रामदेव बाबांच्या आयुष्यातील अनेक पैलू उलगडून दाखवण्यात येणार आहेत. रामदेव बाबांचा सर्वसामान्य मुलगा ते जागतिक आयकॉन असा दीर्घ प्रवास यात दाखविला जाणार असून बाबांचे सहकारी बाळकृष्ण यांच्याही आयुष्याशी निगडीत अनेक घटनाही दाखवण्यात येणार आहेत.'चिल्लर पार्टी' फेम नमन जैन हा बालकलाकार या मालिकेत बालपणातील रामदेव बाबांच्या भूमिकेत दिसणार आहे. खुद्द अजय देवगण याने ट्विट करत नमनच्या भूमिकेबाबत सांगितले आहे
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews